क्रॉनिक किडणी फेल्युअर (CKD) मध्ये दोन्ही किडण्या खराब व्हायला अनेक महिने वा अनेक वर्षांचा काळही लागू शकतो. ह्या रोगात सुरूवातीला दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी न झाल्याने कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र जशीजशी किडणी अधिक खराब व्हायला लागते, तसतसा रोग्याचा त्रास वाळू लागतो. किडणीची कार्यक्षमता लक्षात घेऊन रोगाच्या लक्षणांबाबत तीन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागणी करता येईल: (प्राथमिक / मध्यम / अंतिम)
    - प्राथमिक अवस्थेत दिसणारी लक्षणे:
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या सुरूवातीला जेव्हा किडणीची कार्यक्षमता ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते, तेव्हा रोग्याला कुठलाही त्रास जाणवत नाही.
अचानक झालेले निदान:
ह्या अवस्थेत इतर आजारांच्या तपासणीदरम्यान किंवा वैद्यकीय तपासणी दरम्यान बहुतेक रोग्यांत ह्या रोगाचे अचानक निदान होते. ह्यावेळी रक्तात क्रिएटिनिन आणि युरियाच्या प्रमाणात केवळ थोडीशीच वाढ झालेली दिसून येते. फक्त सकाळीच चेहऱ्यावर दिसणारी सूज हे ह्या रोगाचे प्रथम लक्षण असते.
उच्च रक्म्तदाब:
३० वर्षांहून कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि औषधे घेऊनही तो नियंत्रणात येत नसेल, तर त्याला किडणी फेल्युअर कारणीभूत असू शकते.
दोन्ही किडण्या खराब झाल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्म्यता असते.
                         
                    
                       
                            
                            
    - रोगाच्या मध्यम अवस्थेत दिसणारी लक्षणे:
जेव्हा किडणीची कार्यक्षमता ६५ ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होते तेव्हा रक्तातल्या क्रिएटिनिन आणि युरियाच्या प्रमाणातही क्रमशः वाढ झालेली दिसते. अशा अवस्थेतही अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र बऱ्याच रुग्णांमध्ये अशक्तपणा, रक्ताची कमतरता, सूज, उच्च रक्तदाब, रात्रीच्या वेळी लघवीच्या प्रमाणात वाढ अशी लक्षणे दिसून येतात.
    - अंतिम अवस्थेत दिसणारी लक्षणे:
किडणीची कार्यक्षमता जेव्हा ८० टक्क्यांपेक्षाही कमी होते; म्हणजेच किडणी केवळ २० टक्के कार्य करत असते, तेव्हा किडणी फेल्युअरच्या लक्षणात वाढ व्हायला लागते. तरीही अनेक रोग्यांमध्ये औषधोपचारांमुळे तब्येत ठीक राहते. जेव्हा किडणीची कार्यक्षमता ८५ ते ९० टक्के कमी होते तेव्हा त्याला 'एन्ड स्टेज किडणी फेल्युअर' (End Stage Kidney Failure) असे म्हणतात. किडणी फेल्युअरच्या अशा अवस्थेत औषधे घेऊनही रुग्णाला होणारा त्रास नियंत्रित येऊ शकत नाही. तेव्हा डायलिसिस किंवा किडणी प्रत्यारोपण आवश्यक ठरते.
किडणी जास्त खराब झाल्यानंतर शरीरातील रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत पाणी, आम्ल आणि क्षार यांचे संतुलन ठेवण्याच्या कार्यात कमतरता दिसून येते आणि रोग्याला होणाऱ्या त्रासात वाढ होऊ लागते.
अन्नावरील वासना उडणे, अशक्तपणा आणि मळमळ ही किडणी फेल्युअरच्या बहुतेक रोग्यांची प्राथमिक तक्रार असते.
                         
                    
                       
                            
                            कॉनीक किडणी फेल्युअरची सामान्य लक्षणे:
प्रत्येक रोग्यात किडणी खराब होण्याची लक्षणे आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. रोगाच्या या अवस्थेत आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे: •	खाण्याची अनिच्छा, उलटी, उमासे येणे.
    - अशक्तपणा जाणवणे, वजन कमी होणे.
- थोडेसे काम केल्यावरही थकणे व धाप लागणे.
- रक्ताल्पता (ॲनिमिया) होणे.
- किडणीत एरिथ्रोपोएटिन नावाचे संप्रेरक कमी झाल्यामुळे शरीरात, रक्त कमी निर्माण होणे.
- अंगाला खाज येणे.
- स्मरणशक्ती कमी होणे.
- झोप अनियमित होणे.
- औषधे घेऊनही उच्च रक्तदाब नियंत्रणात न येणे.
- स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितता आणि पुरुषांत नपुंसकत्व येणे.
- किडणीत तयार होणाऱ्या सक्रिय ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती कमी होणे. ज्यामुळे मुलांच्या उंचीवर परिणाम होतो, तर मोठ्या व्यक्तींमध्ये हाडे दुखण्याचा त्रास उद्भवतो.
औषधे घेऊनही रक्तदाबाच्या फिकेपणात कोणतीही सुधारणा न होण्याचे कारण क्रॉनिक किडणी फेल्युअरही असू शकते.
                         
                    
                       
                            
                            क्रॉनिक किडणी फेल्युअरची गंभीर लक्षणे:
किडणी फेल्युअरच्या कारणांमुळे त्रासात वाढ झाल्यावरही जर योग्य उपचार केले नाहीत, तर पुढील जीवघेणे त्रास होऊ शकतात.
    - खूप धाप लागणे.
- रक्ताची उलटी होणे.
- रोग्याला अर्धशुद्धीत असल्यासारखे वाटणे आणि बेशुद्ध पडणे.
- रक्तात पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे हृदय अचानक बंद पडू शकते.
क्रॉनिक किडणी फेल्युअरचे निदान:
कोणत्याही रोग्याला होणारा त्रास पाहून किंवा रोग्याच्या तपासणी दरम्यान किडणी फेल्युअर होण्याची शंका वाटली, तर पुढील तपासण्यांद्वारे निदान निश्चित करता येते.
१) रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण:
किडणी फेल्युअरच्या रुग्णात ह्याचे प्रमाण कमी असते.
२) लघवीची तपासणी:
जर लघवीतून प्रथिने जात असतील तर ही किडणी फेल्युअरची पहिली भयानक निशाणी असू शकते. मात्र किडणी फेल्युअरच्या व्यतिरिक्त अन्य कारणांनाही लघवीतून प्रथिने जाऊ शकतात, हेही शक्य आहे. त्यामुळे लघवीतून प्रथिने जाणे हे क्रॉनिक किडणी फेल्युअरचे लक्षण आहे असे मानता कामा नये. लघवीतील संसर्गाचे निदानही याच तपासणीद्वारे करता येते.
३) रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाची तपासणी:
क्रॉनिक किडणी फेल्युअरचे निदान आणि उपचारांसाठी ही सर्वात महत्त्वपूर्ण तपासणी आहे. किडणी अधिक खराब होण्याबरोबरच रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाचे प्रमाण वाढत जाते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांची नियमितपणे ही तपासणी केल्यास, किडणी किती खराब झाली आहे आणि उपचारांनी त्यात किती सुधारणा झाली आहे, याची माहिती मिळू शकते.
उच्च रक्तदाब असणे आणि लघवीतून प्रथिने जाणे ही ह्या रोगाची प्राथमिक लक्षणे असू शकतात.
                         
                    
                       
                            
                            ४) किडणीची सोनोग्राफी:
किडणीच्या डॉक्टरांचा तिसरा डोळा समजली जाणारी ही तपासणी किडणी खराब होण्याचे कारण काय ह्याच्या निदानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. किडणी फेल्युअरच्या बहुतेक रोग्यांत किडणी संकुचित होऊन आकार छोटा होतो. अँक्युट किडणी फेल्युअर, मधुमेह, अँमायलॉइडोसिससारख्या रोगांमुळे जेव्हा किडणी खराब होते, तेव्हा किडणीच्या आकारात वाढ झालेली दिसते. मुतखडा, मूत्रमार्गात अडथळा आणि पॉलीसिस्टिक किडणी डिसीजसारख्या किडणी फेल्युअरच्या कारणांचे योग्य निदान सोनोग्राफीद्वारे करता येते.
५) रक्ताच्या इतर तपासण्या:
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांच्या रक्ताच्या इतर चाचण्यात, सिरम इलेक्ट्रोलायट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, बायकोर्बोनेट आदींचा समावेश असतो. किडणी काम करीत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांबाबतही रक्ताच्या तपासण्यांपासून माहिती मिळते.
सोनोग्राफीमध्ये जर दोन्ही किडण्या संकुचित होऊन छोट्या झालेल्या दिसल्या तर ते क्रॉनिक किडणी फेल्युअरचे लक्षण असते.